प्रभारी गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांना केज येथे पाठवा - संजय गवळी परळी गटशिक्षण अधिकाऱ्याचा अनागोंदी कारभार


परळी (प्रतिनिधी) दि.24 -: परळी गट शिक्षणाधिकारी (प्रभारी) गणेश गिरी यांना त्यांचा मूळ पदावर केज या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती  केज येथे बदली झाली होती, पण राजकीय वरदहस्त प्राप्त असल्यामुळे ते परळी इन्चार्ज म्हणून पदभार सांभाळून काम करत आहेत, व राजकीय वरदहस्ता मुळे मनमानी कारभार करत आहेत, त्यांना मूळ ठिकाणी पाठवणे बाबत संजय गवळी यांचे बीड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदन दिले आहे.

सध्या बीड जिल्ह्यात अनेक विभागात प्रभारी पदाधिकारी यांचा बोलबाला आहे, त्यातच परळी गटशिक्षण अधिकारी गणेश गिरी (प्रभारी) हे मूळ केज पंचायत समिती येथे कार्यरत आहेत, त्यांना परळी गटशिक्षण अधिकारी तो ही प्रभारी म्हणून नियुक्त केला आहे, त्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठवून परळी शहराला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी देण्यात यावा या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संजय गवळी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे मागणी केली आहे, सन 2018 मध्ये पंचायत समिती केज येथेल पदावर पंचायत समिती अंबाजोगाई येथून बदली झाली होती परंतु गेली चार ते पाच वर्षा पासून गटशिक्षणाधिकारी परळी म्हणून पदभार घेऊन मनमानी कारभार सांभाळ करत आहेत, म्हणून त्यांना गट शिक्षण अधिकारी पदभार काडुन मूळ पदस्थापना च्या ठिकाणी पाठवावे , केज येथे कामावर रुजू होण्यास किंवा तेथील पदाचा कारभार करण्यास त्यांची इच्छा होत नाही, म्हणून माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी  गणेश माधव गिरी यांच्या संपूर्ण कामाची चौकशी करून त्यांना परळी गटशिक्षण अधिकारी पदावरून तात्काळ काढून मूळ  पदावर नियुक्त करावे, अशी समस्त परळीकराची मागणी होत आहे, तरी या प्रकरणाचा आपण तात्काळ विचार करून जातीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्या वर मूळ ठिकाणी पाठवावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी परळी तर्फे व्यापक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संजय गवळी यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर