डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळ घडलेली घटना. आंबेडकरवादी व पोलिस प्रशासनाच्या तत्परते मुळे मोठा अनर्थ टळला


बीड (प्रतिनिधी) -: बीड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळ एक अर्ध नग्न अवस्थेतील तरुण अचानक पणे दारूच्या नशेत पुतळ्याच्या लोखंडी शिडी वर चढला त्याला रोखण्या साठी त्याच्या पाठीमागे आंबेडकरवादी कार्यकर्ते पदाधिकारी धावले व त्याला  पकडले व त्याचे हातपाय बांधून ऑटोरिक्षा मध्ये टाकून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार इतका झटपट घडा की त्या तरुणाला खाली घेऊन येताना दहा बारा जणांना कसरत करावी लागली, आंबेडकरवादी व पोलीस प्रशासनाने दक्ष राहून मोठी घटना घडण्या पासून त्याला रोखले व मज्जाव केला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आंबेडकरवादी व पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या तरुणास काही करण्या अगोदरच ताब्यात घेतले व पेठ बीड पोलिस स्टेशन याठिकाणी चौकशी साठी घेऊन गेले आहेत घटनास्थळा वर पोलीस व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी झालेल्या प्रकारा नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
व या घटनेनंतर आंबेडकरवादी पदाधिकारी कार्यकर्ते व पोलिसांनी सर्व जनतेला शांतता राखावी अशी विनंती केली कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला