उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासप्ताह हॅण्डस् फ्री सॅनिटायझर डिस्पेन्सरचे शाळा महाविद्यालयांना वाटप उपक्रमाचा शुभारंभ


परळी वै.(प्रतिनिधी) -: राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात आज(दि.२२) कोविड यौदध्यांचा सन्मान करण्यात आला तसेच हॅण्डस् फ्री सॅनिटायझर डिस्पेन्सरचे शाळा महाविद्यालयांना वाटप करण्यात आले.
        राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान दरवर्षी आधार महोत्सव आयोजित केला जातो त्यात सामाजिक जाणिवेतून लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जातात.यावर्षी कोरोनाचे जागतिक संकट उभे राहिलेले आहे. परळी शहरात देखील कोरोना रुग्ण वाढत आहेत या अनुषंगाने या वर्षी दोन्ही लाडक्या नेत्यांचा 'वाढदिवस सेवा सप्ताह" म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला. या मध्ये विविध सेवा उपक्रम राबविले. यामध्ये आज दि.२२ परळी शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयायांना हॅन्डफ्री सॅनिटायजर डिस्पेन्सर वितरित केले जाणार आहेत. शैक्षणिक संस्थांसाठी वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.
      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, अय्युब पठाण,प्रा.डॉ.विनोद जगतकर, महादेव रोडे,अजय जोशी,सय्यद सिराज,संतोष शिंदे,जमील अध्यक्ष,सुनील चव्हाण , डी जी शिंदे, बालु हांगीरगे ,पापा देशमुख,दीपक तांदळे,विलास अरगडे, आनकाडे सर ,सचिन मराठे,सोमठाणे सर, अनवर सर, सुधीर मिसाळ रवी गुलभिले आदींसह शिक्षकवृंद,कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला