शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले 'हे' आवाहन!


बीड (दि. ३०) - : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पीककर्जाच्या संबंधित एक महत्वपुर्ण निर्णय घेतला असून, पीक कर्जापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार खरीप हंगाम २०२० - २१ मध्ये पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे कर्ज मिळत नाही , त्यांना तलाठ्यांमार्फत आपली माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित शेतकऱ्यांनी आपली माहिती आधार कार्ड, पॅन कार्ड, गावचे नाव, मोबाईल क्रमांक, शेतकऱ्याचा एकूण लाभक्षेत्र यासह सविस्तर माहिती विहित नमुन्यामध्ये सादर करण्याबाबत आवाहन केले आहे.

ना. मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देशित केल्याप्रमाणे सदर आदेशान्वये, संबंधीत शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन ते तलाठी - मंडळ अधिकारी यांचेमार्फत मार्गी लावून त्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच गावातील सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा बँकेच्या यादीत एखाद्या शेतकऱ्याला पीक कर्जासाठी अपात्र ठरवले असल्यास त्याचे अपात्रतेचे कारण लेखी स्वरूपात देण्याचेही या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान सर्व पात्र शेतकऱ्यांनी पीककर्ज घेण्यासाठी आवश्यक करवाई करावी तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन ना. मुंडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर