परळीत पत्रकारांना पेट्रोल देण्यास बंदी;पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ?
बीड (प्रतिनिधी) :- परळीत स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण झाल्यामुळे परळी शहरात धारा 144 लागूं केला असून संचार बंदीचे आदेश देण्यात आले आहेत .कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दि 5 जुलै ते 12 जुलै पर्यंत कोणीही विनाकारण रस्त्यावर अथवा घराबाहेर फिरू नये तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांनाच पेट्रोल दिले जावे असे आदेश देण्यात आले मात्र इलेक्ट्रॉनिक मेडियाच्या पत्रकारांना बातम्या घेण्यासाठी घराच्या बाहेर जावेच लागते घडलेल्या घटना कॅमेऱ्यात घ्याव्याच लागतात .लोकशाहीच्या चौत्या आधार स्थाभाला वेठीस धरण्याचे काम तसेच आवाज दाबण्याचा काम प्रशासनाच्या वतीने केले जात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.
अत्यावश्यक सेवेत पत्रकार येत नाहीत का?
नेहमीच पत्रकारांना वंचित का ठेवले जाते?
डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी पोलिक प्रशासन यांना पेट्रोल देण्यात येते मात्र जनतेचा दबलेला आवाज उचलण्याचे काम मेडिया करते मात्र आज पत्रकारांनच अत्यावश्यक सेवेत असतांना सुद्धा वंचित करण्याचे काम परळी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment