अँड.सुरेश सिरसाट व योगेश नानवटे मित्रमंडळाच्या वतीने कोविड योध्द्यांना चहा,नाष्ट्या सोबत बिर्याणी वाटप सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
परळी वै.दि.२० (प्रतिनिधी) -: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवस सेवा सप्ताहा निमित्ताने शहरातील विधिज्ञ सुरेश सिरसाट व योगेश नानवटे यांच्या मित्रपरिवाराने कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलांतील कोविड योध्यांना त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणी जाऊन चहा, नाष्टा व अमावस्येला चक्क बिर्याणी वाटप करण्यात आली.
शहरात विविध ठिकाणी संचारबंदी दरम्यान लावण्यात आलेल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला दिवसभर थांबावे लागत आहे. शहरात संपूर्ण संचारबंदी असल्याने पोलीसांना साधे पाणी सुध्दा मिळत नाही.मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अँड. सुरेश सिरसाट व योगेश नानवटे मित्र मंडळाच्या वतीने सात दिवस प्रत्येक ठिकाणी जाऊन पोलिसांना चहा पाणी, नाष्ट्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे सध्या पावसाचे दिवस आहेत. शहरात पावसाची अधूनमधून बऱ्यापैकी हजेरी लागत आहे. भर पावसातही सेवा योध्यांचे कार्य सुरू आहे. शहरातील टॉवर चौक,नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद चौक, बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पूल , छत्रपती संभाजी महाराज चौक, मोंढा मार्केट, महात्मा गांधी मार्केट, गणेशपार, बरकत नगर आदी भागांत हा उपक्रम पार पडला. मागील सात दिवस मित्रमंडळाच्या वतीने कर्तव्यावरील पोलीस दलातील कोविड योध्यांना स्पॉटवर फळं, नाश्ता, चहा आदी गोष्टींचे सहाय्य करण्यात आले. यात त्यांची भावना म्हणजे आपल्यासाठी ऊन पावसात उभे राहून प्रसंगी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोडून कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी कर्तव्य निभावणाऱ्या कोविड योध्यांना यथाशक्ती मानवंदना देणे आहे. दरम्यान रविवारी (ता.१९) आषाढ महिना संपून सोमवार (ता.२०) पासून श्रावण महिना सुरू होत आहे. शहरात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने परिसरातील सर्वजण श्रावण महिना पाळतात. यानागरिकांसाठी रविवार नाँनव्हेज खाण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने अँड.सुरेश सिरसाट व योगेश नानवटे, सुरेश नानवटे, शिवाजी सोळंके, रमेश जाधव व मित्रमंडळानी रविवारी (ता.१९) चक्क बिर्याणीचे वाटप केल्याने पोलिसांनी आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment