कन्टेंनमेंट भागांना प्रतिबंधीत करण्यासाठी नगर पालिकेने जबाबदारी घेवून कमी खर्चात उपाययोजना कराव्याजिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंदुलाल बियाणी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


परळी (प्रतिनिधी) -: कोरोना (Covid-19) या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. ज्या भागात रूग्णांची संख्या वाढत आहे त्या भागाला प्रतिबंधीत करतांना या भागात येणाऱ्या व जाणाऱ्या नागरीकांना पूर्णत: प्रतिबंध होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधीत नगर पालिकेने याची जबाबदारी घेवून कमित कमी खर्चात बॅरिकेटींग करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व नगर पालिकांच्या क्षेत्रात हे काम व्हायला पाहीजे व यासाठीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा परळी नगर पालिकेचे नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.
जिल्ह्यातील बऱ्याच शहरात बॅरिकेटींग करण्यासाठी पोलिसांकडे हवी ती यंत्रणा किंवा साहीत्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. कन्टेनमेंट झोनला प्रतिबंधीत करतांना संपूर्णत: पोलिसांवर विसंबून राहता येणार नाही, यासाठी त्या शहरातील नगर पालिकेने जबाबदारी घेवून पत्र्याच्या कमी खर्चातील बॅरिकेटींगसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याबाबत आपल्याकडून आणि तज्ञ समितीकडून याचा विचार विनिमय व्हावा व कन्टेनमेंट झोनसाठी १० फुटाच्या पत्र्याच्या बॅरिकेटींगची व्यवस्था करण्यसाठी प्रयत्न केले जावेत. याबरोबरच कन्टेनमेंट झोनमध्ये काम करणारे नगर पालिका कर्मचारी, आशा वर्कर्स, पोलिस कर्मचारी यांना स्वत:च्या सुरक्षेसाठी पीपीई किट देणे आवश्यक आहे. नगर पालिका क्षेत्रात ही जबाबदारी नगर पालिका प्रशासनाने आपल्या मार्गदर्शनाखाली घ्यायला हवी. नागरीकांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षासुध्दा महत्वाची असल्यामुळे या गोष्टींचा विचार केला जाणे आवश्यक आहे. वरिल दोन्हीही मुद्यांचा आपण सकारात्मक विचार करावा अशी मागणी चंदुलाल बियाणी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला