शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नाही याला जबाबदार कोण -भाई गौतम आगळे


परळी(प्रतिनीधी) -: जिल्हायातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायत आस्थापनेत कार्यरत कंत्राटी / रोजंदारी सफाई कामगारांना किमान वेतन व अस्थितवातील अदयावत प्रचलीत कामगार कायदे असतांना सुध्दा त्याचा लाभ सफाई कामगारांना मिळत नाही, याला जबाबदार कोन असा सतंप्त सवाल कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी मा.ना.मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री तथा बीडजिल्हा पालक मंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.           या बाबत सविस्तर वृत असे की जिल्हयातील सर्व मुख्याथिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत व जिल्हा प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताने हा गोरखधंदा चालतो की काय अशी चर्चा कामगार करतांना दिसुन येत आहे. जिल्हयात मागील अनेक वर्षा पासून शासनाच्चा परिपत्रकायी, उद्योग, उर्जा व कामगार विभागाने काढलेत्या पत्राची तसेच मा. ज़िल्हाअधिकारी, अप्परजिल्हाअधिकारी, व निवासी उपजिल्हाअधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठीकीच्या ईत्तिवृत्त या सर्वानां केराची टोपली दाखवुन किमान वेतन कायदा व अदयावत प्रचलीत कामगार कायदे पायदळी तुडविले जात आहेत. जिल्हयातील सर्व मुख्याधिकारी कंत्राटदारास पुढे करुन लाखो/ कोटी रुपये कमवत आहेत. त्याचा मलीदा जिल्हा प्रशासकीय अधिकारी,मिलींद सावंत यांच्या मार्फत मा. जिल्हाअधिकारी,कार्यालय,बीड यांच्याकडे जात आहे की काय असा प्रश्न येथील सफाई कामगारांना पडला आहे. त्या मुळे सफाई कामगारांवर होणारा अन्याय कोन रोखनार असा संतप्त सवाल सफाई कामगारांकडून उपस्थितीत केला जात आहे. या प्रकरप्गाकडे संघटनेने गांभीर्याने लक्ष देऊन हा भ्रष्टाचार तात्काळ थांबवावा अश्या तकरारी जिल्हयातील सफाई कामगारांनी संघटनेकडे केल्यामुळे सदरिल निवेदन मा.ना. मुख्यमंत्री,सामाजिक न्यायमंत्री तथा बीडजिल्हा पालकमंत्री यांना देवून येत्या आठ दिवसात प्रकरणाचा निपटारा करावा अन्यथा संतप्त सफाई कामगांर ११ ऑगस्ट 2020 रोजी सकाळी ११ वाजता मा.जिल्हाअधिकरी,बीड समोर व ईतर ठिकानी उपविभागीयअधिकारी/ तहसिल कार्यालया समोर सफाई कामगार प्रत्तिनिधी आमरण उपोषण करणार असे दिलेल्या निवेदनात रोजंदारी मजदुर सेना केन्द्रीय महासचिव भाई गौतम आगळे यांनी नमूद केले आहे. अशी माहिती संघटनेच्या जिल्हाअध्यक्षा अनिता बचुटे यांनी प्रसिघ्दी माध्यमास/सोशल मिडीयास दिली.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर