म.रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल पोटभरे तर परळी तालुका अध्यक्षपदी दिलीप भालेराव यांची निवड.


परळी प्रतिनिधी :- म. रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पदाधिकार्‍यांच्या फेरनिवडी संदर्भात अंबाजोगाई येथील राधानगरी याठिकाणी कास्ट्राईब संघटनेचे विभागीय (लातूर) अध्यक्ष बालासाहेब सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी श्री.गौतम जोगदंड सर  हे होते.         
गेल्या अनेक दिवसांपासून संघटनात्मक कामांचा आलेला अनुभव व प्रशासन,अधिकारी यांच्याकडून काम करून घेण्याची आलेली हातोटी पाहून  महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल पोटभरे तर दिलीप भालेराव  यांची परळी तालुका अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. 
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघ परळी तालुक्यातील कार्यकारणीची ही फेरनिवड करण्यात आली.बीड जिल्हा व परळी तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न माहित असल्याने नवनियुक्त कार्यकारणी हे प्रश्न नक्की मार्गी लावेल असा विश्वास बालासाहेब सोनवणे सर यांनी व्यक्त केला.
इतर संघटनांतील पदाधिकाऱ्यांना एका छत्राखाली आणून कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची बीड जिल्ह्यातील ताकत आणखीनच वाढली आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचे पालन करून पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
याप्रसंगी कास्ट्राईब संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्री.बालासाहेब सोनवणे,बप्पाजी कदम जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष,गौतम जोगदंड   माजी परळी ता.अध्यक्ष,शालीनीताई जोगदंड महिला तालुका अध्यक्ष अंबाजोगाई ,आचार्य ,महेश जाधव ,दिपक गायकवाड , दिपक गायके  नेहरकर ,केशवराज मस्के  साहेब जाधव शिवाजी गायकवाड ,गौतम शिंदे ,केशव भुरके स,सतिष गुट्टे शेख रिझवान  सुदाम दांडेगावकर ,पापुलवार  दासुद  साळवे ,पोटभरे  इ.कास्ट्राईब परिवाराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या निवडी प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला