मीटरची रिडिंग न घेताच वीज ग्राहकांना वाढीव बिले परळीत भाजप देणार वीज वितरण कंपनीला निवेदन


परळी (प्रतिनिधी) दि. १९ -: महावितरण वीज कंपनी गेल्या कांही महिन्यांपासून शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिटर रिडिंग न घेता अवाजवी बिलाची आकारणी करून मनमानी करत असून याविरोधात भाजपच्या वतीने मा. पंकजाताई मुंडे व प्रदेश उपाध्यक्षा खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात आंदोलन करण्यात येणार आहे. परळी येथे संचारबंदी लागू असल्याने आंदोलना ऐवजी वीज वितरण कंपनीला उद्या निवेदन देण्यात येणार असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे व शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

 एकीकडे कोरोना महामारीमुळे अगोदरच शेतकरी, व्यापारी आणि सर्व सामान्य जनता आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशा संकटकाळात वीज वितरण कंपनीचे कार्यालय मात्र ग्राहकांना वाढीव बिलं आकारून अधिक अडचणीत आणत आहे. कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे वीज ग्राहकांना आर्थिक व मानसिक असा दोन्ही प्रकारचा त्रास सहन करावा लागत असून  आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी मा. पंकजाताई मुंडे व खासदार मा.डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सोमवार दि. २० जूलै २०२० रोजी भाजपाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन वाढीव वीज बिलाची 'होळी' आणि 'हालगी बजाओ' आंदोलन करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून परळी येथेही आंदोलन करण्यात येणार आहे, परंतु कोरोनामुळे शहरात संचारबंदी लागू असल्याने कंपनीच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले जाणार आहे. ग्राहकांना होणा-या या त्रासाची तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी सतीश मुंडे व लोहिया यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला