परळीत गावठी पिस्तुल.दोन जिवंत काडतुससह दोघे जेरबंद.


परळी(प्रतिनिधी) -: परळी शहरात रेल्वे  स्टेशन रोड वरील अग्रवाल लाँज जवळ दोघांना एलसीबीच्या पथकाने दोन जिवंत काडतुस व एक गावठी पिस्तुलासह अटक केली असुन सदर घटनेने शहरात खळबळ माजली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की रेल्वे
स्टेशन रोडवर असलेल्या अग्रवाल लाँज जवळ दोन व्यक्तिकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली असता त्याची माहिती पोलीस अधिक्षक यांना पथकाने दिली त्यावर लगेच पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दर 
व एलसीबीचे पो.नि.भारत राऊत यांनी आपल्या मार्गशनाखाली पथक तयार करून  पाठविले सदर  पथकाने अग्रवाल लाँज जवळ संशयास्पद हालचालीवरून तेथे असणाऱ्या दोंघाना ताब्यात घेवुन त्यांची अंग झडती घेतली असता या झडतीत एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुस आढळुन आले असता पोलीसांनी आरोपी क्रमांक 1 )ज्ञानोबा (गोट्या)मारोती गिते वआरोपी क्रमांक 2)आनंद जय अग्रवाल यांना अटक केली असुन त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3(34)नुसार गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेने शहरात खळबळ माजली असुन गावठी पिस्तुल जवळ बाळगण्याचा या दोघांचा काय उद्देश होता याचा तपास पोलीस करीत आहे सदर कारवाई पो.उप.नि.गोविंद एकिलवाले,जमादार भास्कर केंद्रे,मुंजा कुवारे,विकास वाघमारे,नरेंद्र बांगर,रामदास तांदळे व चालक अतुल हराळे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला