दलालांनी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बदनाम करण्याचा विडा उचलला - विजय गायकवाड
बीड(प्रतिनिधि) दि.23 -: बीड येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी बीड यांना जाणिव पुर्वक मानसिक त्रास देण्यासाठीचे काही फोटो सोशल मिडीयाच्या माध्यमातुन व्हायरल करूण त्यांना बदनाम करण्याचे षढयंत्र करत आहेत.
मागासवर्गीय आदिवासी भागातील व्यक्ती उच्च पदावर असल्याचे येथील काही आमदार व त्यांच्या दलाल बगल बच्चांना सहन होत नसल्याचा आरोप जनप्रहार सामाजीक संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी केला आहे. महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी बीड हे कामा मध्ये एक निष्ठ व प्रामाणिक असुन ते कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला व त्यांच्या कार्यकर्त्याच्या दबावाला बळी न पडता आपल्या कामा मध्ये पारदर्शकता ठेवुन काम करत असल्यामुळे येथील काही दलाल मंडळी स्वार्थ साधता येत नसल्यामुळे त्यांच्यावर चिखल फेक करत आहेत.परंतु कर्तव्य दक्ष अधिकार्यांच्या पाठी मागे खंबीरपणे साथ देण्यासाठी जनप्रहार सामाजीक संघटना खंबीर असुन आपण महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी बीड यांच्यावर होत असलेल्या अन्याया बाबत व निलंबनाची मागणी करणार्या विरूद्ध योग्य ती भुमिका वेळ आल्यावर घेणार असल्याचेही यावेळी जनप्रहार सामाजीक संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळवले आहे.
Comments
Post a Comment