ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्प


अकोला,दि.२७ प्रतिनिधी - येथील महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडीच्या गट नेत्या ॲड धनश्री देव व निलेश देव यांच्यावतीने आज रुग्णवाहिकेचे लोकार्पण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

आजच्या कोरोना काळात लोकांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा वेळी सर्वात मोठी समस्या रुग्णवाहिकेची निर्माण झालेली आहे याची जाणीव ठेवून निलेश देव मित्र मंडळाच्यावतीने आज रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, मनपा गटनेत्या ॲड धनश्री देव, प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे, प्रदेश महिला महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर