परळीत पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात दिड हजार लोक
परळी (प्रतिनिधी)- : परळीच्या एसबीआय बँकेत पाच जण पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर परळी शहरासह पंधरा गाव आरोग्य विभागाने सिल केले. परवा पुन्हा एक कर्मचारी या शाखेतील पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागाने या बँकेत आलेल्या लोकांची लिस्ट काढली असता. ति दिड हजारावर गेलेली आहे. या दिड हजार लोकांनी बँकेत येवून व्यवहार केल्याने ते प्रत्यक्ष पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले आहे. त्यामुळे परळीत मोठा धोका निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाचे मिटर वाढतच चालले असून मोठा धोका निर्माण झाला आहे. परळीत एकाच दिवशी एसबीआय बँकेत पाच जण पॉझीटिव्ह निघाले होते. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रत्यक्ष दिड हजार लोकांशी संपर्क आला होता.तर अप्रत्यक्ष अनेकांशी संपर्क आल्याने संपुर्ण शहरासह आसपासची पंधरा खेडी सिल करत पुन्हा संचारबंदी लागू केली आहे.
Comments
Post a Comment