वाढदिवसाच्या दिवशीही धनंजय मुंडे मंत्रालयीन कामकाजात! राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव
मुंबई (दि. १५) - : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज ते थेट मंत्रालयीन कामकाजात दिसले!
पक्षातील नेतेमंडळी, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासह राज्यभरातून त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.
धनंजय मुंडे यांनी मात्र वाढदिवस बाजूला सारून कामकाजाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. आज होणारी मंत्रिमंडळ बैठक काही कारणास्तव रद्द झाली असली तरी ना. मुंडे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात उपस्थित राहून विभागातील अनेक महत्त्वाच्या कामांचा निपटारा केला.
धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून पदाधिकारी व समर्थकांनी ना. मुंडे यांचा वाढदिवस सत्कारणी लावला आहे. परळीसह अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत.
दरम्यान धनंजय मुंडे हे आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील मंत्रालयीन कामकाजात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीही त्यांना कार्यकर्त्यांच्या - समर्थकांच्या गराड्यात असण्याऐवजी लोकांच्या कामांसाठी कामकाजात पाहून समाधान व्यक्त केले जात आहे.
Comments
Post a Comment