परळीशहरातील खड्डे बुजवा नसता मनसेकरणार आंदोलन - श्रीकांत पाथरकर
परळी (प्रतिनिधी) -: परळी शहरात अनेक ठिकाणी विविध कामासाठी रस्ते खोदुन ठेवल्याने मोठमोठे खड्डे पडले असुन ते खड्डे व्यवस्थित बुजवावे नसता मनसेच्या वतीने नगरपरिषदे विरूध्द आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी
नगर परिषदेला एका प्रसिध्दीपत्राव्दारे दिला आहे.
शहरात नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजुस खड्डे केले
असुन रिलायन्स कंपनीच्या वतीने सुध्दा केबल लाईनसाठी रस्त्याची चाळण केली
आहे हि दोन्ही कामे आवश्यक जरूर आहे मात्र अनेक ठिकाणी खोदलेले खड्डे बुजवण्यात आले नसल्याने पावसाच्या पाण्यामुळे खड्डे चुकवित नागरिकांना कसरत करून पुढे जावे लागत आहे तर काही खड्ड्यात नगर परिषदच्या वतीने मुरूमाच्या ऐवजी मोठ मोठाले दगड आणून टाकल्याने वाहन चालक महिला,लहान मुले व जेष्ठ नागरिकांना रस्त्यावरून येण्या जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे तर काठी ठिकाणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी सदर खड्ड्यांची लवकरात लवकर चांगली दबाई करण्यात यावी अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका प्रसिध्दीपत्राव्दारे नगर परिषदेला मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी दिला असुन त्याला मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष दत्ता दहीवाळ, शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर शहर उपाध्यक्ष महेश शिवगन शहर उपाध्यक्ष विठ्ठल झिलमेवाड, सुमित कलशेट्टी श्रीहरी दहीफळे,माणीक लटींगे आदींनी पाठींबा दिला आहे.
Comments
Post a Comment