राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी बांधलेले घर आहे, हा हल्ला देशभरातील समस्त आंबेडकरवादी जनतेवर आहे आणि हे आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत. - विकास रोडे


परळी (प्रतिनिधी) -: दादर चे राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी बांधलेले घर आहे आणि असे लाखो "राजगृह" आम्ही देशात उभा केले आहेत, मनुवाद्यांनो तुम्ही किती राजगृह तोडणार आहात? असा रोखठोक सवाल महाराष्ट्र सरकारला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विकास रोडे यांनी केला आहे व सदरील हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ या निवासस्थानी समाजविघातक व विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून आरोपींचा तपास करून कडक कारवाई करावी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील ‘राजगृह’ ही फक्त इमारत नसून आंबेडकरी, मानवतावादी चळवळीला लागणाऱ्या सामाजिक, वैचारिक ,राजकीय, पिढी घडवण्याची साहित्याची निर्मितीची  खरी ऊर्जा आहे.या  निवासस्थान काल झालेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आहे.

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य  विचार  आज सुद्धा आधुनिक भारत घडवण्यासाठी जनमनात तळागाळात  रुजलेले  आहेत.त्यामुळे कोणतीही  विघातक मनोवृत्ती हे विचार जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत. तोपर्यंत आबाधित आहे. कोणी संपवू शकत नाही. त्यामुळे अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना  कठोर शासन  करून आंबेडकरी जनतेला , मानवतावादी चळवळीला न्याय मिळाला पाहिजे देशातील कोरोना महामारी संकटाचे भान ठेवून राज्यातील व देशातील तमाम आंबेडकरी, मानवतावादी चळवळीतील  कार्यकर्त्यांनी संयम ठेवून कायदा हातात न घेता शांतता पाळावी असे आवाहन विकास रोडे यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह