उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासप्ताह आज कोविड यौदध्यांचा सन्मान व हॅण्डस् फ्री सॅनिटायझर डिस्पेन्सरचे शाळा महाविद्यालयांना वाटप
परळी वै.(प्रतिनिधी) -: राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात आज(दि.२२) कोविड यौदध्यांचा सन्मान व हॅण्डस् फ्री सॅनिटायझर डिस्पेन्सरचे शाळा महाविद्यालयांना वाटप करण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान दरवर्षी आधार महोत्सव आयोजित केला जातो त्यात सामाजिक जाणिवेतून लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जातात.यावर्षी कोरोनाचे जागतिक संकट उभे राहिलेले आहे. परळी शहरात देखील कोरोना रुग्ण वाढत आहेत या अनुषंगाने या वर्षी दोन्ही लाडक्या नेत्यांचा 'वाढदिवस सेवा सप्ताह" म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला. या मध्ये विविध सेवा उपक्रम राबविले. यामध्ये आज दि.२२ परळी शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयायांना हॅन्डफ्री सॅनिटायजर डिस्पेन्सर वितरित केले जाणार आहेत.तसेच कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता कार्यरत असणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडीचे शहराध्यक्ष अजय जोशी मो. क्र.९८५०४१ ७८१७ यांच्याशी संपर्क साधावा.
सेवा उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment