मुस्लिमांच्या धार्मिक संस्कृती मध्ये हस्तक्षेप करणारा प्रतिकात्मक कुर्बानी चा आदेश शासनाने त्वरित बदलावे- गुलशन ए खिजरा परळी


परळी (प्रतिनिधि) :- मुस्लिम समाजाचा महत्त्वाचे सण असणारे इद-उल-अजहा बकरी ईद निमित्त शासनाने काढलेल्या मार्गदर्शक सुचाना मध्य त्वरित बदल करण्यात यावे अश्या मागणी मा मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना परळी चे तहसीलदार मार्फत गुलशन ए खिजरा चे अध्यक्ष शेख अख्तर हमीद व सहकार्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की कोविड-19 च्या महामारी च्या संकटकाळात आपल्या सरकारने संपूर्ण राज्यात सणासुदीत व धार्मिक विधींसाठी नियमावली बनवली आहे त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काही दिवसात मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्त्वाच्या सणानिमित्त (ईदुल अजहा /बकरी ईद ) महाराष्ट्र शासनाच्या गृहविभाग कडून परिपत्रक प्रसिद्ध केले आहे .या परिपत्रकानुसार ईद च्या निमित्त कोणती दक्षता घ्यायची याची प्रसिद्धी दिली आहे. परंतु याच परिपत्रक च्या  क्रमांक 3 नियमात म्हटले आहे की " शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करणे" .
          या मुद्द्यावरच आम्हाला प्रश्न पडला आहे प्रतीकात्मक #कुर्बानी म्हणजे नक्की काय सरकारने याचा खुलासा करावा. "प्रतीकात्मक कुर्बानी "करण्यास सांगणे म्हणजे सरकार चे हेतू वर आम्हाला संशय येत आहे की सरकार आमच्या धार्मिक विधीमध्ये हस्तक्षेप करत आहे असे आम्हाला वाटत आहे. परंतु असे आदेश काढणे योग्य नाही. सर्व समाजाला समान न्याय बरोबर मिळाला पाहिजे. परंतु आपल्या सरकारने बकरी ईद व दुसऱ्या सणा बद्दल जे आदेश काढले आहे ते खरंच दुजाभाव करणारे आहे. आपल्या सरकारकडून अशी अपेक्षा नव्हतीच.
सोशल डिस्टंसिंग च्या व इतर नियम हे आम्हाला सर्वांना मान्य  आहेत आणि त्या नियमांचे पालन मुस्लिम समाज काटेकोरपणे करीत आहे ,परंतु समाजाच्या कोणत्याही विधीत सरकारने हस्तक्षेप करू नये हीच आमची अपेक्षा आहे . तसेच वरील दिलेल्या परिपत्रकात मधील प्रतीकात्मक कुर्बानी चे आदेश हे मागे घ्यावेत व यापुढे असे धार्मिक विधीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष  हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी मागनी गुलशन ए खिजरा सेवा भावी संस्था परळी तर्फे मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र,मा. गृहमंञी महाराष्ट्र यांना करण्यात आली आहे यावेळी शेख अख्तर हमीद, शेख मुख्तार बशीर,शेख तैय्यब मौजम,शेख मुदस्सिर
तोहीद शेख, अबूतलहा शेख,शाहेद खान,अय्युब खान, उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर