महाराष्ट्रात कृषी खात्याने सोयाबीनचा पेरणीचा चुकीचा रिपोर्ट दिला - वसंत मुंडे

परळी (प्रतिनिधी) -: यावर्षी जून पासूनच पावसाची सुरुवात चांगली झाल्यामुळे शेतकरी पहिल्या आठवड्यापासूनच मृग नक्षत्रात पेरणी चालू केली त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली परंतु बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी  शासनाकडे  केल्या आहेत यावर शासनाने चौकशी  उपविभागीय कृषी अधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली  चौकशी समिती नेमली या समितीने उलटे शेतकऱ्यांच्या पेरणी संदर्भातल्या चुका दर्शविल्या कारण जिल्हा कृषी अधीक्षक विभागीय कृषी सहसंचालक आयुक्त कृषी महाबीज महामंडळ च्या संगनमताने पोषक अहवाल देण्यासंदर्भात सूचना अलिखित दिलेल्या आहेत हे खरे कारण आहे यामध्ये शेतकऱ्याच्या शेतात पिक पाहणी करून दोष शेतकऱ्याचा आहे असा अहवालात दाखवून मंत्रालय स्तरावर दबावतंत्राचा वापर करून अहवाल संगनमताने सादर केला आहे असा आरोप काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केला आहे  पाउस नसताना शेतकऱ्यांनीपेरणी केली  ट्रॅक्टर ने पेरणी केली  बैला द्वारे पेरणी केली  सर्व सोयाबीनचे बी खोल जमिनीत गेले   त्यामुळे ते उगवले नाही असा खोटा रिपोर्ट समितीने तयार करून  कृषी विभागाकडे दाखल केला आहे अशी माहिती वसंत मुंडे यांनी केली आहे पेरणी कशी करावी किती जमिनीमध्ये ओल असावी आज पर्यंत शेतकऱ्यांना ज्या पेरण्या केल्या त्याकाळी सर्व खोट्या होत्या इथून पाठीमागे बी-बियाणे खरेदी करून पेरण्या प्रत्येक शेतकऱ्याने केला त्यावेळेस का तक्रारी केल्या नाहीत यावेळेस का तक्रारी केल्या वस्तुस्थिती असताना शेतकऱ्यांच्या माथी स्वतःचे अवगुन झाकण्यासाठी कृषी खाते हे मोठे षड्यंत्र  शेतकऱ्याच्या विरोधात करीत आहे असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे 40 हजार मेट्रिक टन मध्यप्रदेश मधून बियाणे खरेदी करण्यासाठी  परवानगी कोणी दिली त्यास खरेदीस 20 टक्के जास्त दराने 6 हजार कोटी रुपयाचे सोयाबीनचे बियाणे साठी  कोणी खर्च केले ते बोगस बियाणे महाबीज कडून सर्वांनी मॅनेज करून प्रधान सचिव कृषी आयुक्त यांनी  महाबीज बियाणे मध्यप्रदेश च्या बाजारपेठेतून खरेदी करून महाबीज कंपनीकडे वर्ग केले ही वस्तुस्थिती आहे महाबीज एम डी  अकोला येथे महाबीज लॅब टेस्टिंग रिपोर्ट अर्थात बीज तपासणी प्रयोगशाळा अंतर्गत पास बियाणे करून बाजारपेठेमध्ये विक्रीस दिलेले आहे अकोला नागपूर परभणी पुणे अनेक ठिकाणी तसेच विद्यापीठ यांच्याकडे प्रयोगशाळा बी बियाणे तपासणीच्या आहेत सर्व मॅनेज करून खाजगी कंपन्या ठराविक रक्कम देऊन नापास चे पास दाखवून टेस्टिंग रिपोर्ट मंजूर करून घेतात त्यामुळे शेतकरी बोगस बियाणे मध्ये भरडला आहे बीटी कॉटन बॅग मागे 7 रुपये ते 20 रुपये कमिशन दिले जाते तर सोयाबीनच्या 30 ते 60 रुपये बॅग मागे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सह मंत्रालयापर्यंत कमिशन दिले जाते म्हणून महाराष्ट्रात बोगस बियाणे चा सुळसुळाट झाला आहे याची शहानिशा होणे काळाची गरज आहे यासाठी शासनाने खास पथक मा मुख्यमंत्री व मुख्य सचिवांनी नेमून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केली आहे प्रत्येक बियाण्याच्या कंपनीकडे स्वतःच्या टेस्टिंग साठी लॅब आहेत परंतु शासनामार्फत तपासणी करून सत्य दर्शक बियाणे संदर्भात कंपनीकडे प्रमाण प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे जास्तीत जास्त अकोला महाबीज महामंडळ ऑफिस कडून बीज तपासणी प्रयोगशाळा येथील अधिकारी यांना मॅनेज करून सोयाबीन व इतर सर्व बियाणे पास करून घेतले जातात ठराविक टक्केवारी देऊन नापास बियाणे असले तरी व्यवहार झाल्यावर पास करून देण्याचे महाबीज प्रयोगशाळेचे मोठे लागे बंद खाजगी कंपन्यांचे आहेत शेतकऱ्यांच्या जीवाशी कृषी खाते खेळत आहे शासनाचे दुर्लक्ष असून अगोदरच बाजारपेठ शेतकऱ्याच्या हातात नाही निसर्गावर शेतकरी अवलंबून आहे अवकाळी पाऊस गारपीट दुष्काळ बाजारपेठेतील चढ-उतार कोरणा रोग जागतिक मंदीची लाट इत्यादी चा परिणाम शेतकऱ्याच्या जीवनाशी होत असून शासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे जे कोणी  तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक विभागीय सहसंचालक संचालक कृषी आयुक्त महाबीज एमडी मंत्रालय स्तरावर चे वरिष्ठ अधिकारी यांचे संगनमत मुळे महाराष्ट्रात सोयाबीनचे खराब बियाणे शेतकऱ्याला पुरवल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे याची शहानिशा करून कंपनी व अधिकाऱ्यावर एफ आर दाखल करून त्यांना निलंबित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला