वंचित तर्फे अत्यावश्यक साधनसमुग्रीचे वाटप
मुंबई (प्रतिनिधी) दि. २२ - चेंबूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृहात येणाऱ्या रुग्णांना अनेकदा वॉर्डापर्यंत हलविण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांची ऐनवेळी तारांबळ उडते. ही गरज लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीतर्फे रुग्णालयास स्ट्रेचर देण्यात आले आहे. तसेच चेंबूर येथील मॉं रुग्णालयासही मेडिसिन ट्रॉली देण्यात आली आहे.
मुंबईमध्ये कोरोनाने सध्या थैमान घातले असतांना रुग्णालयांना वैद्यकीय सामुग्रीची नितांत गरज आहे. ही बाब लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी तर्फे संतोष रोकडे यांनी पुढाकार घेऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे.चेंबूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृहाला स्ट्रेचर उपलब्ध करून दिले. तसेच चेंबूर येथील मॉं रुग्णालयासही मेडिसिन ट्रॉली देण्यात आली. त्याच बरोबर ४ हजार मास्क देण्यात आले.
या वैद्यकीय सामग्री वितरणाच्या वेळी स्वप्नील जवळगेकर, रोहित जगताप, अनिल म्हस्के, आकाश गवळी, संदेश वाघमारे, किरण निकम,स्वप्नील गरुड,ऋषभ ढोणे,वैभव पांडव,महेश साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment