डी टी एड बी एड स्टुडंड असोसिएशनच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड (प्रतिनिधी) -: दि.10 जुलै 2020 रोजी डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात तसेच बीड जिल्ह्यात शिक्षकभरती संदर्भात डिग्री जलाव आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शन डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.हे आंदोलन राज्यातील रखडलेली शिक्षकभरती, शिक्षणसेवकांचे मानधनवाढ, 50% मागासवर्गीय पदकपात, बी एम सी मधील रिजेक्ट उमेदवार याना न्याय देण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी करण्यात आले या आंदोलनात आज प्रत्येक जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवार , शिक्षणसेवक यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला सर्व जिल्ह्या मध्ये शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला ,या आंदोलनातुन बेरोजगारांन मध्ये एक प्रकारचा असंतोष दिसून आला,मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री ,शिक्षण आयुक्त याना मेल करण्यात आले
शासनाने वरील मागण्यांकडे सकारात्मक निर्णय घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने आगामी काळात या पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा सरकारला देण्यात आला.
Comments
Post a Comment