मौजे लिंबुटा येथे तृण नाशक फवारणीसादग्राम निर्मिती प्रकल्प समितीचा उपक्रम
परळी,दि.१९ ,(प्रतिनिधी ) -: तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटा च्या वतीने रविवार, दि.१९ जुलै रोजी तृण (तण) नाशक फवारणी करण्यात आली.
गावातील मागच्या वर्षी वृक्ष लागवड केलेला हनुमान मंदिर समोरील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा,देवीच्या मंदिराचा परिसर तसेच गावांतर्गत सर्व रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या तृण,गवतावर ही तृण नाशक फवारणी करण्यात आली. "सादग्राम"चे कार्याध्यक्ष विश्वनाथ बंकटराव मुंडे(आबा),उपाध्यक्ष विश्वांभर ज्ञानोबा दोडके,सदस्य विकास ज्ञानोबा दिवटे,ग्रामस्थ विष्णू पाटलोबा मुंडे व आदिनाथ सौदागर दोडके,रोहन खाडे आणि सादग्राम संस्थापक अध्यक्ष अशोक मुंडे यांनी या फवारणीत आपले योगदान दिले.
गावातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मागील जुलै २०१९ मध्ये लावलेल्या वृक्षारोपांचे आता जवळपास वृक्षात रूपांतर झाले आहे.१०० पैकी १०० वृक्ष रोपं "सादग्राम"च्यावतीने व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने लावली ,वाढवली व जगवली आहेत. वृक्षांच्या संरक्षक जाळ्या २१ जून रोजी कढून त्यांना आळे व्यवस्थित करण्यात आले.त्यांच्या अनावश्यक वाढलेल्या फांद्यांची छाटणीही करण्यात आली होती.. ग्रामपंचायत कडून यावर्षी वृक्ष संरक्षक जाळ्या उपलब्द होणार नसल्यामुळे यावर्षी जाळ्या कशा उपलब्द करायच्या यासंदर्भात २९ जून रोजी सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीची बैठक घेण्यात आली. नवीन वृक्ष लागवडीसाठी संरक्षक जाळ्या बँक,सिमेंट फँक्टरी वा इतर एखाद्या देणगीदांराकडून मिळतीका ?यासंदर्भात चाचपणी केली.परंतू ते शक्य झालं नाही.त्यामुळे यावर्षीची २०० वृक्ष रोपांची संकल्पीत लागवड जवळजवळ थांबवलीच आहे. त्यानंतर कोरोना बाधितांची तालुक्यातील वाढती संख्या पाहता गावातील ग्रामस्वच्छता व इतर सर्व कामं ५ जुलै पासून थांबवली आहेत. तण खुपच वाढायल्यामुळे आज तृण नाशक फवारणी करण्याचा हा निर्णय घ्यावा लागला .
मे२०१९.पासून संत गाडगे महाराज सेवाभावी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मौजे लिंबुटा येथे सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीच्या माध्यमातून सादग्राम (आदर्शगाव) निर्मितीच्या दृष्टीने गावाची वाटचाल सुरू आहे.
Comments
Post a Comment