पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे शेतक-यांचा विमा भरण्याचा प्रश्न सुटला ! खामगांव, मालेवाडी आले प्रधानमंत्री विमा पोर्टलवर ; शेतक-यांनी विमा भरण्यास केली सुरवात


परळी (प्रतिनिधी) दि. २७ -: पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून तालुक्यातील मालेवाडी, खामगांव ही गांवे आता प्रधानमंत्री विमा पोर्टलमध्ये समाविष्ट झाली आहेत. गावातील शेतक-यांनी या पोर्टलवर  विमा भरायलाही सुरूवात केली आहे. दरम्यान, पंकजाताई मुंडे यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल  दोन्ही गावच्या शेतक-यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

  मालेवाडी व खामगांव ही गांवे तेथील ग्रामस्थांच्या मागणीवरून पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असताना  परळी तालुक्यात समाविष्ट करून घेतली होती. तालुक्याचे ठिकाण बदलल्याने या गावांना केंद्राच्या गॅझेटमध्ये येण्यासाठी विलंब लागला.  प्रधानमंत्री पीक योजनेतंर्गत विमा भरण्यासाठी या गावातील शेतक-यांना मात्र यामुळे मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत होते. शेतक-यांनी ही अडचण पंकजाताई मुंडे यांच्या कानावर घातली असता त्यांनी गेल्या आठवडयात जिल्हाधिकारी रेखावार यांना दूरध्वनी करून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवर लगोलग हालचाली केल्या आणि काल या दोन्ही गावाचा समावेश प्रधानमंत्री विमा पोर्टलमध्ये झाला. शेतक-यांनी या पोर्टलवरून विमा भरायला सुरवातही केली आहे. शेतक-यांच्या मदतीला धावून येत विम्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल खामगावचे सरपंच श्रीराम बडे, ग्रा. प. सदस्य विश्वास बडे, मालेवाडीचे सरपंच भूराज बदने व शेतक-यांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर