अतिवृष्टी व पीक विम्याचे पैसे बँकेत जमा असतानाही वाटप का नाही ? - वसंत मुंडे

परळी(प्रतिनिधी)-: महाराष्ट्रात 2019 ला अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनामे करून अनुदान मंजूर करण्यात आले. 2019 चा पिक विमा मंजूर आहे ,तरीही  बँकाकडून शेतकऱ्यांना का वाटप करीत नाहीत  असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी केला आहे.  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून 2019 चा पिक विमा अतिवृष्टी रक्कम तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करून संबंधित ज्या त्या बँकेकडे पैसे वर्ग केले आहेत .तरीही शेतकऱ्यांना कठीण प्रसंगी मदत होईल अशी आशा आहे परंतु बँक स्तरावर वाटप अनुदान केले जात नाही याची कसून चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली आहे .कोराना रोगा मुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कारण गेली चार महिने झाले सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून शेतीमाल योग्य  भावा न मिळाल्यामुळे अडचणीत शेतकर्याच्या भर पडली आहे.पेरणीला शासन स्तरावर तात्काळ कर्ज वितरण करण्यासंदर्भात आदेश आले, परंतु बँकेकडून जाणून-बुजून शेतकऱ्याला त्रास कसा होईल अशी रचना करण्यात आली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्याला कर्ज पुरवठा वेळेवर होत नाही करिता अतिवृष्टी व पीक विम्याचे पैसे तात्काळ वाटप करण्याचे आदेश काढण्यासंदर्भात मा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांना मुख्य सचिवांमार्फत पिक विमा व अतिवृष्टीचे वाटप  ची विनंती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केलेली आहे, तरी तात्काळ शेतकऱ्याला पिक विमा व अतिवृष्टी चे पैसे आठ दिवसाच्या आत मिळतील असा शासन स्तरावर शब्द मिळालेला आहे ,अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर