धोबी समाजाच्या कुटुंबियांना वंचितकडून अन्नधान्याचे वाटप
औरंगाबाद, (प्रतिनिधी) -: औरंगाबाद शहरातील हातावर पोट असणाऱ्या लॉन्ड्री धारक (परीट) कुटुंबीयांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगल यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक गरजू कुटुंबीयांनी याचा लाभ घेतला.
कोरोनामुळे राज्यात लॉक डाऊन सुरू आहे. त्यात शिथिलता आणली तरी काही दुकानांना अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. जी दुकाने सध्या उघडी आहेत तिथे ग्राहक नाहीत, त्यामुळे अनेक दुकानदाराच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या लोकांना मदत करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यानुसार वंचितचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अमित भुईगल यांच्या प्रयत्नाने ७१ धोबी समाजाच्या कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल व साबण अशा जीवनावश्यक वस्तूं देण्यात आल्या. राज्यात लॉक डाऊन चालू झाल्यापासून धोबी कुटुंबीयांचा व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने त्यांची उपासमार होत होती. धोबी समाजाचे पदाधिकारी बि.डी. सूर्यवंशी, राजेंद्र बोरुडे, मगनराव गायकवाड, रामदास शिंदे, रवींद्र बर्वे यांच्या हस्ते या धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. एन नाईन एच, श्रीकृष्ण नगर हडको येथील संत गाडगेबाबा स्मारक सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. संदीप केटे, अरकेश पगारे, विनोद साळवे व अमोल वानखेडे यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment