सामाजिक न्याय मंञ्यानी शहीद मोहसीन शेख परिवाराला न्याय मिळवून द्यावे. - जस्टीस फाॅर मोहसीन मुवमेंट


२०१४ साली मोहसीन शेख या २८ वर्षाच्या आयटी इंजिनीयरची पुण्यातील हडपसर परिसरात हत्या करण्यात आली. गुन्हा दाखल होऊन सहा वर्षं झाली. हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह एकूण २३ जणांना अटक करण्यात आली होती. तीन आरोपींना जामीन देताना, न्या. मृदुला भाटकर यांनी पुढील नोंद केली- मोहसीनची हत्या धार्मिक भावना भडकावल्या मुळे झाली होती. आरोपींच्या भावना यावेळी भडकवण्यात आल्या होत्या. त्यांना असं कृत्य करण्यासाठी उसकवण्यात आलं होतं. मोहसीनची चूक एकच होती की तो मुस्लीम धर्मीय होता. या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने या तिघांच्या जामीनावर पुनर्विचार करण्याचे आदेश दिले होते, शिवाय जामीन मंजूर करताना धर्मनिरपेक्ष देशात न्यायालयाने अशा प्रकारची  टिप्पणी करणं, धर्माच्या नावाखाली गुन्ह्याचं समर्थन करणारे वक्तव्य हे न्यायाला धरुन नाही, असं म्हणत उच्च न्यायालयाला फटकारलं होतं. मोहसीन शेखच्या कुटुंबियांना राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत केली आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचं आश्वासन दिलं. मात्र मोहसीन शेखच्या भावाला अजून सरकारी नोकरी मिळालेली नाही. या प्रकरणात न्यायालयात खेटे घालण्यात आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचं काम हे कुटुंबीय करत आहेत. मोहसीनचे वडील सादिक शेख यांचं गेल्या 2 वर्षा पूर्वी निधन झालं परंतु अजून मोहसीनला न्याय मिळालेला नाही. या प्रकरणात मुख्य आरोपी धनंजय देसाईसह सर्व आरोपी जामीनीवर सुटले आहेत.
_आमचा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या कडून एकच मागणी आहे की मोहसिन शेखला न्याय मिळावा आणि त्यावेळी  राज्य सरकारने जे वचन दिला होता त्याच्या भावाला सरकारी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे व जी रक्कम शासनाने परिवाराला  देण्याचे आश्वासन दिले होते ती ही पुर्ण करण्यात यावी .._

मोहसीनचे घराची परिस्थिती

मोहसीनच्या घरची परिस्थिती बेताचीच,एक छोटंसं झेरॉक्स सेंटर होत त्यावर घर चालायचं.शिक्षण घेत मोहसीन ही झेरॉक्स सेंटर मध्ये काम करायचा.पुढे काहीतरी करण्याची ईच्छा त्यासाठी संघर्षाची तयारी असणारा महत्वकांक्षी मोहसीन स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यात आला होता.
पुण्यातील हडपसर परिसरात एक छोटी खोली भाड्याने घेऊन तो आणि त्याचा छोटा भाऊ मुबीन राहायचे.मोहसीनने सुरवातीला एका कॉल सेंटर मध्ये काम करून पुढील शिक्षण(MCA Microsoft)पूर्ण केल होते.त्यानंतर एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करायचा.पुढे त्याने एका नामांकित कंपनीतही नोकरी साठी मुलाखत दिली होती त्यात त्याने स्वतःच्या बौद्धिक क्षमतेने कंपनीचा सिक्युरिटी सॉफ्टवेअर प्रोजेक्ट तयार केला होता त्याआधारे त्याची पहिल्या राऊंड मध्ये निवडही झाली होती लवकरच दुसरा राऊंड पूर्ण होणार होता आणि त्याच स्वप्न पूर्ण होणार होत.एक चांगली नोकरी मिळणार होती,त्याचा संघर्ष संपणार होता,घरच्यांना आता चांगले दिवस तो दाखवू शकत होता मात्र म्हणतात ना नियतीच्या खेळापुढे कुणाच चालत तसच त्या कट्टरवादी,आक्रमक आणि हिंसक टोळीपुढे मोहसीनच काहीच चाललं नाही.त्या एकट्या जीवाचं चालणार तरी काय म्हणावं अशी मागणी जस्टीस फाॅर मोहसीन मुवमेंटचे सदस्य शेख अख्तर हमीद यांनी केली आहे

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला