मिलिंद कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत नैत्रदीपक यश


परळी (प्रतीनीधी) -: महाराष्ट्र राज्य माध्य.व ऊच्च माध्य.शिक्षण मंडळ,पुणे अर्थात  एच एस सी बोर्ड यांनी नूकताच बारावीचा निकाल आॅनलाइन घोषित केला असुन,येथील मिलिंद कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालात बाजी मारलेली आहे.यावर्षी विज्ञान शाखेचा निकाल 80 टक्के तर कला शाखेचा निकाल 69टक्के असा लागलेला आहे.
कला शाखेतुन चि. घोबाळे राजकुमार याला 80 टक्के मिळाले असुन तो महावाद्यालयातुन सर्वप्रथम आला आहे.त्याचबरोबर विज्ञान शाखेतुन कु. शेख आफिफानाज मुस्थफा हीस 68टक्के गुण मिळाले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थियांचे संस्थाअध्यक्ष अॅड अनंतराव जगतकर व प्राचार्य के एन पवार यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी आभिनंदन केले आहे.
मिलिंद कनिष्ठ महाविद्यालय हे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असुन ते एक जुन्या काॅलेजपैकी एक आहे,येथे विद्यार्थीयांवर संस्कार करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात,या काॅलेजचे यशस्वी विद्यार्थी भारतभर विविध क्षेत्रात कार्यरत दिसतात.
विद्यार्थी सर्वांग घडावा व त्याला कोचिंगची गरज पडु नये म्हणुन जादा तास घेऊन विद्यार्थी तयार केले जातात.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला