उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त सेवासप्ताह आज कोरोना मदत कक्षाचा शुभारंभ व थर्मोस्कॅनर पल्सऑक्सिमटर चे वितरण
परळी (प्रतिनिधी) -: राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान सेवासप्ताह आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये आज दि.१५ रोजीकोरोना मदत कक्षाचा शुभारंभ व थर्मोस्कॅनर पल्सऑक्सिमटर चे वितरण करण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान दरवर्षी आधार महोत्सव आयोजित केला जातो त्यात सामाजिक जाणिवेतून लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जातात.यावर्षी कोरोनाचे जागतिक संकट उभे राहिलेले आहे. परळी शहरात देखील कोरोना रुग्ण वाढत आहेत या अनुषंगाने या वर्षी दोन्ही लाडक्या नेत्यांचा 'वाढदिवस सेवा सप्ताह" म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या मध्ये विविध सेवा उपक्रम राबविले जाणार आहेत.
कोरोना मदतकेंद्र आज सुरू करण्यात येत असून या मध्ये सर्व कोविड सैनिकांना सॅनिटायजर, मास्क व पूरक सर्व साहित्य उपलब्ध करुन दिले जाईल.परळी शहरातील सर्व गर्दीच्या ठिकाणी जसे तहसिल, नगरपरिषद, वीज वितरण,पंचायत समिती, बस स्थानक,रेल्वे स्थानक,सर्व बँक आदी ठिकाणी थर्मोस्कॅनर भेट दिल्या जाणार आहेत.तरी या सेवा सप्ताहातील विविध सेवा उपक्रमांत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment