उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासप्ताह आजपासून बजाते रहो.... वादन स्पर्धा ; स्पर्धकांनी व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन


परळी वै. (प्रतिनिधी) -: राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात आजपासून बजाते रहो.... वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.आज,(दि.२१)पासून ही स्पर्धा  सुरू होत आहे. आपले तीन मिनिटापर्यंत चे कोणतेही वाद्य वाजवतांनाचे व्हिडीओ  पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
      लॉकडाउनचा काळ अधिक सुसह्य आणि आनंदी जावा म्हणून अबाल वृद्धाकरिता विविध ऑनलाईन स्पर्धा सेवासप्ताहात आयोजित केल्या आहेत. यामध्ये बजाते रहो.... वादन स्पर्धा  आयोजित करण्यात आली आहे.सर्व स्पर्धा या ऑनलाईन असून खुल्या गटासाठी असतील सर्व सहभागी स्पर्धकांना गौरवपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जातील. आज,(दि.२१)पासून  स्पर्धा  सुरू होत असुन आपले तीन मिनिटापर्यंत चे  व्हिडिओ रामेश्वर महाराज कोकाटे   मो.क्र.९८५०११९४८३, व शंकर कापसे मो.क्र.९४०४२७७७७१ यांच्याकडे पाठवावेत.

     सेवा सप्ताहातील विविध सेवा उपक्रमांत व ऑनलाईन स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला