पटेकर कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत मागासवर्गीय कुटुंबांना शस्त्र परवाने द्या - प्रशांत वासनिक
गेवराईचे आमदार कुणाच्या बाजूने ?
गेवराईच्या आमदारांनी अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेतली का ? व ते कोणाच्या बाजूने आहेत याचाही जाब विचारण्यासाठी पटेकर कुटुंबाच्या भेटीसाठी आज शिष्टमंडळ गेले होते. माजलगाव तालुक्यातील मु. पो. टाकरवन या गावात काही दिवसापूर्वी गावातील रस्त्यावरून जात असताना मोटर सायकलचा हॉर्न वाजवला साईड मागितली म्हणून त्यांना पुढे जायचे होते पण मग्रूर जातीयवादी मानसिकतेतून बैलगाडी चालक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राग आला पटेकर बंधूंना गाव गुंडानी मारहाण केली होती. त्यामध्ये सचिन पटेकर, विकास पटेकर, प्रशांत पटेकर यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा इलाज हा औरंगाबाद खासगी रुग्णालयात चालू आहेत, त्याची अवस्था ही गंभीर स्वरूपाचे आहे, सदरील प्रकरणातील चार आरोपी पोलिसांनी पकडले आहेत एक आरोपी फरार आहेत, पीडित कुटुंबाची भेट घेऊन याठिकाणी त्याची चौकशी करण्यासाठी बीएसपी चे नेते प्रशांत वासनिक, सतीश गवारे, पत्रकार विश्वनाथ शरणागत, बालाजी जगतकर,यांच्यासह अनेक जण आले होते.
पटेकर कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्यांक यांच्या वरील अन्याय अत्याचार हल्ले सहन केले जाणार नाहीत, असेही या पत्रकाद्वारे प्रशांत वासनिक यांनी सांगितला आहे. भविष्यात असे जर हल्ले वाढत गेले तर महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीयांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मागासवर्गीयां वर होत असलेल्या हल्ल्याचा यावेळी निषेध त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचा ग्रह खातं कुचकामी ठरत असताना दिसत आहे असे त्यांनी पत्रकात म्हणाले आम्ही अन्यायग्रस्त कुटुंबाच्या बाजूने कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहोत असेही त्यांनी सांगितलं आहे.
लवकरच बीडच्या पोलीस अधीक्षकांना या प्रकरणासंबंधी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment