कोरोनामुळे मयत झालेले शिक्षक जब्बार शेख यांच्या कुटुंबीयांना ५० लाखाचा संरक्षण विमा तात्काळ मंजूर करावा
मराठवाडा शिक्षक संघाची राज्य शासनाकडे मागणी
परळी वै.(प्रतिनिधी):- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दिलेले कर्तव्य बजावत आसतानाच कोरोनाची लागण होऊन मृत्यू पावलेले शिक्षक जब्बार शेख यांच्या कुंटूबीयांना ५० लाख रुपये विमा संरक्षण कवचाचा लाभ त्वरीत देण्यात यावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे व सरचिटणीस व्ही.जी.पवार यांनी राज्य शासनाने कडे केली आसल्याची माहिती म.शि.संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शहरातील पेठमोहल्ला भागातील रहिवाशी व सिरसाळा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेवर कार्यरत आसलेले शिक्षक जब्बार शेख सर यांना परळी शहरात लॉकडाऊनच्याकाळात कोरोना आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची माहिती व घरपोच किराणा सामान वाटपाची ड्यूटी देण्यात आली होती. त्यांनी दोन-तीन दिवस हे दिलेले काम केले. परंतु त्याच दरम्यान ते S.B.I.बँकेतील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले आसल्याची माहिती त्यांना कोरोना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळवण्यात आली. व त्यांना आरोग्य विभागाकडे स्वँब देऊन घरीच क्वॉरंनटाईन होण्याचे सांगितले. म्हणून त्यांनी परळी तहसीलदार यांच्याकडे तसा माहितीस्तव लेखी अर्ज सादर केला व स्वँब देऊन ते घरीच क्वॉरंनटाईन झाले. त्यांच्या स्वँबचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना उपचारासाठी आंबाजोगाई येथील कोवीड सेंटर मध्ये
दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्रकती खलावत चालल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू आसतानाच त्यांचा सोमवार (दि.२०) जुलै रोजी मृत्यू झाला.त्यामुळे त्यांच्या कुंटूंबावर दु:खाचे व घरातील कमवता माणूस गेल्यामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांना या दु:खातून सावरण्यासाठी व आर्थिक विवचंनेतुन बाहेर येण्यासाठी शासनाने कोवीड-१९ चे कर्तव्य बजावताना राज्यातील कर्मचाऱ्यांना कोरोनाने मृत्यू आल्यावर त्यांना ५० लाखाचे विमा संरक्षण कवच देण्याचे लेखी आदेश काढले आहेत. त्याचा लाभ कोरोनाचे कर्तव्य बजावत आसतानाच कोरोनाची लागण होऊन मृत्यू पावलेले शिक्षक जब्बार शेख यांच्या कुंटूबीयांना तात्काळ देण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे व सरचिटणीस व्ही.जी.पवार यांच्यासह शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष डी.जी.तांदळे, सचिव राजकुमार कदम,अशोक मस्कले, एस.जी.स्वामी, सुरेश काजळे,के.आर.कसबे, परवेज देशमुख, आलिशान काजी, राजकुमार लाहोटी, महादेव धायगुडे, राजेश साखरे, कालीदास धपाटे, चंद्रशेखर साखरे,नागनाथ तोंडारे,सोपान निलेवाड,अविनाश लोणीकर, बंडू चव्हाण, श्रीहारी दहिफळे, ज्ञानोबा गडदे,अनंत मुंडे आदिनी केली आसल्याची माहिती अघाव यांनी दिलीआहे.
Comments
Post a Comment