वीज वितरण कंपनीचा भोंगळा कारभार ...वीज वितरण कंपनीचा सर्वसामान्यांना झटका..अधिकारी ,कर्मचारी यांची उडवाउडवीची उत्तरे - डॉ.नितिन सोनवणे
बीड (प्रतिनिधी) दि.19 -: बीडमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचा कहार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहेत यामध्ये रोजगार उपलब्ध नाही त्यामध्ये रोजगार व व्यवहार ठप्प आहेत, व यामध्ये बीड जिल्हा वासियांना जास्तीची विद्युत बिले देण्यात आली आहेत, जास्तीच्या वीजबिलाचा झटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे , याचा जाब विचारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला तर ती उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, फोन घेत नाही, अशा मग्रूर बेजबाबदार अधिकाऱ्यां वर योग्य ती कारवाई करावी व सर्वसामान्य जनतेची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते डाॅ. नितीन सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे किती आहे, बीड शहरात विद्युत वितरण कंपनी मध्ये नवीन आलेले अधिकारी बेजाबदार पणे वागत आहेत. ग्राहकाचे फोन उचलण्यास यांना वेळ नसतो. फोन कित्तेक प्रयत्न केल्यावर उत्तर मिळते उड़वा उड़विचे देतात. प्रत्येक भागाला एक लाईनमन दिला आहे तो लाईनमन कधीच फोन उचलत नाहीत, उचलला तर दारू पीयूउन बोलल्या सारखे उत्तरे देतात असे असंख्य तक्रारी सर्वसामान्यांच्या आहे
पाऊस चालू नसला तरी विज (लाईट) जाते कशी? हा एक प्रश्ण आहे. विद्युत वितरण अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चाललाय हे मात्र नक्की याच्यात सर्व सामान्य जनतेची पिळवणूक होते आहे. लॉकडाउन मध्ये सर्व सामान्य लोकांचे वीज बिल माफ करणार होते हे सरकार त्याचे काय झाले. उलट बर्याच बीड शहरात व जिल्ह्यात वाढीव बिल जनतेला आल्याचे उघड झाले आहे.
याचा तोडगा निघणार आहे का? हा मोठा प्रश्न आहे. असे बेजबाबदारी ने वागणाऱ्या अधिकार्यांना योग्य ती कारवाई करून आळा घालणे आवश्यक आहे. अधिकारी फोन उचलत नाहीत कर्मचारी वेळेवर येत नाहीत असी असणारी परिस्थिती आहे. वीज वितरण कंपनीच्या कस्टमर केअरला आज फोन केला तर कार्यवाही चा दोन दिवसांनी फोन येतो. ही केवळ खाजगी कारणाचे परिणाम आहेत हे नक्की त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे अन्यथा त्याचे परिणाम कंपनीच्या कर्मचाऱ्याची परिणाम भोगावे लागतील. वंचित बहुजन आघाडीचे नेते नितीन सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे आव्हान केले आहे.
Comments
Post a Comment