प्रकती अस्वास्थ्यामुळे रूपाली चाकणकर रूग्णालयात दाखल.


पुणे (प्रतिनिधी) -: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे तातडीने रूग्णालयात दाखल केलं आहे. आज त्यांना अवस्थ वाटू लागल्याने तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपूर्वी त्यांना बरं वाटत नसल्याने पुण्यातल्या सिंहगड रोड इथल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं. उपचारानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. मात्र आज पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे.

रूपाली चाकणकर गेल्या १५ दिवसांपूर्वी जालना दौऱ्यावर होत्या. जालना दौऱ्यावरून पुण्यात आल्यापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. डेंगुची लक्षणं जाणवत असल्याने तसंच त्यांना पेशी कमी जास्त होण्याचा त्रास होत असल्याने त्यांची प्रकृती बरी नव्हती.

दरम्यान, चाकणकर यांची कोरोनाची चाचणी देखील करण्यात आली आहे. मात्र कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आता त्यांना पुढील उपचारासाठी रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला