कामगार कल्याण केंद्रातर्फे शंभर कामगारांना मास्कचे वाटप सामाजिक अंतर ठेवा, घरी रहा, सुरक्षित रहा: जी. एस. सौंदळे


परळी (प्रतिनिधी) -: कोरोना संसर्गाची लागण कामगारांना होऊ नये व कामगार सुरक्षित राहावे, यासाठी कामगार कल्याण केंद्राच्या वतीने येथील राज्य परिवहन मंडळातील कर्तव्यावर असणाऱ्या शंभर कामगारांना मास्कचे वाटप करण्यात आले. 
 यावेळी आगार प्रमुख रणजित राजपूत, समुपदेशक जी. एस. सौंदळे, वाहतूक निरिक्षक  अनिल बिडवे, केंद्र संचालक आरेफ शेख यांच्या हस्ते कामगारांना मास्कचे  वाटप करण्यात आले. 
 राज्य परिवहन मंडळातील तंत्रज्ञ, लिपिक व इतर कर्मचाऱ्यांना या मास्कचे वितरण करण्यात आले.  कामगारांना वाटप करण्यात आलेले मास्क कामगार कल्याण केंद्राच्या महिला कर्मचारी उमा ताटे व मसरत खान यांनी स्वतः तयार केले आहे.
 यासह अंबाजोगाई, बीड, कळंब, उस्मानाबाद, लातूर, उदगीर, निलंगा येथील कामगार केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांनी तयार केलेले मास्क ही विविध आस्थापनेतील  कामगारांना वाटप करण्यात आले. मास्क तयार करणाऱ्या  महिला कर्मचाऱ्यांची कामगार कल्याण अधिकारी भालचंद्र जगदाळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
 प्रत्येक नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवावे व  घरी राहावे आणी सुरक्षित रहावे,  असे आवाहन समुपदेशक  जी. एस.  सौंदळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला