जिल्ह्यातील न.प.क्षेत्रातील नागरिकांची ऑक्सीमिटर व थर्मल स्क्रीनींगद्वारे आरोग्य तपासणी करावी चंदुलाल बियाणी ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी यांना निवेदन कोरोनाची भिती टाळण्यासाठी तपासणी आवश्यक

परळी (प्रतिनिधी) -: बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दरदिवशी वाढत चालला असून प्रशासनाने चांगल्या उपाय योजना जिल्हाभरात राबविल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणावर पुढील काळात विषाणूची लागण होण्याची भिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर राज्यात काही नगर पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात प्रभाग निहाय थर्मल स्क्रीनींग व ऑक्सीमिटरद्वारे नागरिकांची तपासणी सुरु केली आहे. बीड जिल्ह्यातही या पद्धतीने दक्षता समितीमार्फत नागरिकांची तपासणी करावी, असे आवाहन बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी बीड यांना बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी एक निवेदन देत बीड जिल्ह्यातील वाढत चाललेले कोरोना रुग्ण आणि भविष्यातील कोरोनाची भिती लक्षात घेऊन न.प.क्षेत्रातील जिल्ह्यातील नागरिकांची दक्षता समितीमार्फत तपासणी करण्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायत क्षेत्रात संबंधीत क्षेत्राच्या नगरसेवकांचा प्रमुख समावेश असलेल्या दक्षता समितींची स्थापना करण्यात आली आहे. संबंधीत नगर पालिकांनी ऑक्सीमिटरद्वारे तपासणी व थर्मल स्क्रीनींग मोहिम हाती घेण्याबाबत तात्काळ उपाय योजना अंमलात आणणे गरजेचे आहे. या तपासणीमुळे रुग्णसंख्या निश्चित होऊन उपाय योजना करणे सोपे जाणार आहे. हे काम करणार्‍या दक्षता समितीतील सदस्यांना मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोज, फेसशिल्ड आदी सुरक्षा साधणेही देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. सदरच्या तपासणी मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन तपासणी होऊन भविष्यकाळातील संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. दरम्यान, या निवेदनाचा नागरिकांच्या आरोग्य सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून सकारात्मक विचार करावा व मार्गदर्शक सुचनांसह नगर पालिकांना तशा आशयाचे आदेश निगर्मित करावेत असे आवाहन बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे. 
या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, नगराध्यक्षा परळी न.प. व मुख्याधिकारी न.प. यांना देण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला