शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वीच विमा भरावा-सोपान मुंडे


परळी (प्रतिनिधी) - : प्रधानमंत्री पिक विमा योजना बीड जिल्ह्यासाठी विशेष प्रयत्नाने मंजूर झाली असून आपले सरकार सेवा केंद्र तसेच विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवून घ्यावा असे आवाहन नागदरा येथील युवा शेतकरी सोपान मुंडे यांनी केले आहे.
   शेतकर्यांसाठी खरीप हंगामात  पिक विमा भरण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2020 असून यामध्ये कुठलीही मुदतवाढ  मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता असे दिसून येते की शेतकरी अगदी शेवटची तारीख येईपर्यंत विमा उतरवत असतात. शेवटी शेवटी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास विमा उतरवणे शक्य होत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपल्या पिकाचा विमा उतरून घ्यावा असे आवाहन नागदरा येथील युवा शेतकरी सोपान मुंडे यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर