तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर
परळी (प्रतिनिधी) -: येथील श्री संत जगमित्र नागा मंदिर येथे चित्रीकरण झालेल्या कीर्तन सेवा झी टॉकीज चैनल वरून दिनांक 13 जुलै पासून प्रसारित होत आहेत त्यामध्ये आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आळंदी येथील विश्वशांती केंद्राचे समन्वयक श्री ह भ प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर यांची झाली त्यांनी कीर्तनासाठी 'देवाच्या प्रसादे करारे भोजन' हा अभंग निवडला होता .या अभंगावर विवेचन करत असताना महाराजांनी तीर्थक्षेत्र परळी चे वैशिष्ट्य त्यांच्या खुमासदार शैलीमध्ये सांगितले ,परळी क्षेत्र आणि आळंदी क्षेत्र हे एकाच अधिकाराचे क्षेत्र आहेत असे महाराज म्हणाले कारण आळंदी मध्ये सिद्धेश्वर दैवत आहे आणि ज्ञानेश्वर महाराज संत आहेत त्याचप्रमाणे परळी मध्ये सुद्धा भगवान वैद्यनाथ देव आहे आणि संत जगमित्र नागा हे संत आहेत. भगवान शंकर आणि वारकरी संत असे वैशिष्ट्ये या दोन्ही क्षेत्रांचे आहे. अशा पवित्र क्षेत्रांमध्ये आणि पवित्र साधूच्या दरबारात झी टॉकीज चैनल वर प्रसारित होणारी कीर्तन सेवा सेवा करताना मला अतिशय आनंद होतो आहे असेही महाराजांनी आपले मनोगत व्यक्त केले . सदरील ...
Comments
Post a Comment