गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे लाईव्ह प्रवचन.
परळी (प्रतिनिधी) -: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत अहमदपूर येथील भक्तीस्थळावर होणारा गुरुपौर्णिमा महोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी ‘झक्कास मराठी’ ‘महाराष्ट्र माझा’ व ‘मराठवाडा साथी’ या फेसबुक पेज चॅनेलवर राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या लाईव्ह प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणासह सबंध देशभरातून हजारो भावीक पायी दिंडीच्या रूपाने गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी अहमदपूर येथील भक्तीस्थळावर दाखल होतात. भक्तीस्थळावर डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा तिर्थप्रसाद व आशीर्वाचन होते परंतु यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी ‘झक्कास मराठी’ ‘महाराष्ट्र माझा’ व ‘मराठवाडा साथी’ यांनी पुढाकार घेऊन “मानवी जीवनातील गुरुचे महत्व” या विषयावर राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या लाईव्ह प्रवचनाचे आयोजन केले आहे. आज रविवार दि.५ जुलै रोजी सायंकाळी ठीक ४:०० वाजता फेसबुकवरील ‘झक्कास मराठी’ ‘महाराष्ट्र माझा’ व ‘मराठवाडा साथी’ या फेसबुक पेजवर नागरिकांनी लाईव्ह प्रवचनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन अर्जुन फड व सौ.कीर्ती कपिल बुरांडे व ओमप्रकाश बुरांडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment