भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
परळी (प्रतिनिधी) -: भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील भारतीय बौद्ध महासभा शाखा जयगाव ता परळीच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे सचिन रणखांबे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत बनसोडे ,आर्जुन चोपडे ,प्रा बालाजी साबळे, रोहण डोंगरे यांची उपस्थिती होती, सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प आणि पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून जयगावात 12 वीत प्रथम आलेला चि.तेजस भीमराव साळवे- 92%; द्वितीय कु. करूणा महादेव साळवे-73% ;तृतीय कु.सुप्रिया माणिक साळवे -70%आणि इयत्ता 10 वीत प्रथम चि.अरविंद सुनिल साळवे - 82%;द्वितीय कु. शिवानी माणिक साळवे - 77% तृतीय चि.अनिकेत संदिपान साळवे- 76% आदि विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर महामानव हे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आर्जुन चोपडे यांनी 10 वी 12 वीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम 250/- बक्षीस दिले.सचिन रणखांबे ,हनुमंत बनसोडे, आर्जुन चोपडे आणि प्रा बालाजी साबळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रस्तावित मुरलीधर साळवे यांनी केले. सूत्रसंचालन माणिक साळवे यांनी केले तर भारत साळवे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संतोष साळवे,भीमशाहीर वाल्मीक साळवे ,संभाजी साळवे, आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे विशेष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोसल डिस्टंन्स आणि सॅनिटायजरचा वापर करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला होता.
Comments
Post a Comment