परळी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी आजही 17 च कोरोना पाॕझिटिव्ह
परळी वै.(प्रतिनिधी) -: परळी शहर व तालुक्यातील दि 2आॕगस्ट रोजी 102कोरोना संशयीताचे स्वॕबचे नमुणे घेण्यात आले होते.त्या 102 पैकी 17 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत.या कोरोना संसर्गामुळे परळी तालुक्यात कोरोनाग्रस्ताची संख्या आता 252 झाली आहे.
आज राञी आरोग्य प्रशासनाने जाहिर केलेल्या अहवालात शहरात 14तर ग्रामीण भागातील धर्मापुरीत 3 असे एकुण 17 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत.
परळी शहरातील 35 वर्षीय महिला परळी, 58 वर्षीय महिला परळी ,45 वर्षीय महिला मोंढा मार्केट,18 वर्षे पुरुष गांधी मार्केट, 35 वर्षीय महिला परळी ,38 वर्षीय पुरुष परळी, 36 वर्षीय पुरुष परळी ,32 वर्षीय महिला भिमवाडी, 27 वर्षे पुरुष भीमवाडी,26 वर्षीय पुरुष परळी,53 वर्षे पुरुष गुरुवार पेठ ,22 वर्षीय महिला विद्या नगर ,45 वर्षीय पुरुष स्वाती नगर, 50 वर्षीय महिला हमालवाडी,तर तालुक्यातील धर्मापुरी येथील 40 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला,17वर्षीय महिला हे नव्यानेच कोरोनाना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आज परळी तालुक्याचा कोरोना आकडा 252 वर गेला आहे.
Comments
Post a Comment