परळीत अॕन्टीजन तपासणीत 195 पैकी 16 पाॕझिटिव्ह


परळी (प्रतिनिधी) -: शहरात आरोग्य प्रशासनाच्या वतिने शहरातील व्यापारी कामगार भाजी विक्रेते अदी नागरिकांच्या अॕन्टीजन टेस्ट तपासणी कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्या पासुन चार बुथवर सुरु करण्यात आला सकाळी 11 वाजे पर्यत 195 नागरिकांनी आपली अॕन्टीजन तपासणी करुन घेतली आहे.या 195 पैकी 179 व्यक्ती निगेटिव्ह आढळुन आले तर 16 व्यक्ती कोरोना बाधीत आढळुन आले आहेत.



बुथ क्रमाक 1]लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदीर येथे 60 नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये 54निगेटिव्ह तर 6पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.

बुथ क्रमांक 2]सरस्वती विद्यालय येथे 35 नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये 34निगेटिव्ह तर 1पाॕझिटिव्ह आढळुन आला आहे.

बुथ क्रमांक 3] बस स्थानक येथे 25 नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये 24निगेटिव्ह तर 1 पाॕझिटिव्ह आढळुन आला आहे

बुथ  क्रमांक4] प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 75 नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये 67 निगेटिव्ह तर 8 पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.

उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक,तहसीलदार विपीन पाटिल,वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर,नोडल अधिकारी डॉ दिलीप गायकवाड अदी अधिकारी वर्गानी बुथ केंद्रावर नियंत्रण केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह