महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उखळी बु येथील 474 शेतकर्यांना पिक कर्ज वाटप.
सोनपेठ ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उखळी बु येथील शेतकऱ्यांना बॅक गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत बँकेने 2 कोटी 90 लाख रुपये एवढे पिक कर्जाचे 474 शेतकर्यांना वाटप करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी मा. कुणाल डुकरे साहेब यांनी दिली असून वंचित शेतकऱ्यांनी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रासह परभणी जिल्हा मधील सोनपेठ तालुक्यात लाॅकडाऊन असल्याने पिक कर्ज वाटपास लाॅकडाऊन उघडल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पिक कर्ज देण्याचे आदेश दिल्याने तालुक्यातील उखळी बु, उखळी खु, उखळी तांडा, पारधवाडी, लोकरवाडी, बुकतरवाडी, नखतवाडी, कारबेटवाडी, कासारवाडी शिवार, मानकादेवी शिवार, उक्कडगाव आदी गावे दत्तक असलेल्या या शाखेकडे आतापर्यंत 2 कोटी 90 लाख रुपये एवढे कर्ज वाटप करण्यात आले आहे. आणि नविन कर्ज मागणी अर्ज 1250 पैकी 150 शेतकऱ्यांना 91 लाख रुपये वाटत करण्यात आले आहे. अशी माहिती शाखाधिकारी कुणाल डुकरे, डी. आर. कोटलवार, सावतु मुजमुले यांनी दिली.
Comments
Post a Comment