टोकवाडी येथे लोकसहभागातून शेतकऱ्यांनी तयार केला शेतरस्ता 70 वर्षाचा प्रश्न मिटला

 
परळी वै.(प्रतिनिधी) :- गावातील रस्ते तयार करण्यासाठी गावकर्यांना शासनदरबारी खेटे मारावे लागतात तरीही गावाला जोडणारे शेत रस्ते तयार होत नाहीत. परंतु टोकवाडी येथील सुजाण शेतकरी एकत्र येऊन टोकवाडी ते बेलंबा हा दोन किलोमीटरचा पाठ (कँनाँल) शिव रस्ता लोकसहभागातून तयार करण्यात आला. गेल्या 70 वर्षापासून प्रंलबित असणार हा प्रश्न अखेर गावकर्यांनीच सोडविला. 
         टोकवाडी येथील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे युवा नेते संजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन, तुकाराम मुंडे, लहूदास मुंडे, बालाजी आघाव सर यांच्या सहकार्ययाने व सर्व गावातील 34 शेतकऱ्यांना सोबत घेऊन 8 दिवसा मध्ये हा टोकवाडी ते बेलंबा पाठ कँनाँल शिव रस्ता पूर्ण केला, या कमी, टिपपर, ट्रॅक्टर , डोजर, रोलर या साहित्याचा वापर करून व त्यांच्या मदतीने सर्वांनी मिळून स्व खर्चातून हा दोन किलोमीटर अंतराचा रस्ता तयार केला. हा अत्यंत खराब झाला होता. त्यामुळे दुरुस्ती कडे शासनाने लक्ष दिले गेले नसल्याने हा रस्ता गावकर्यांना व शेतकऱ्यांना व जनावरांना येता जाता तारेवरची कसरत करावी लागत होती. या पाठ कँनाँल शिव रस्त्यावर पाच तेू सहा फुट चिखलमय रस्ता होत होता. त्यामुळे संजय मुंडे व गावकर्यांच्या पुढाकाराने हा रस्ता दुरुस्ती करून घेऊन 70 वर्षांपासून रखडलेल्या. रस्ताचा प्रश्न मार्गी लावला आहे. 
         हा रस्ता तयार केल्यामुळे शासनाने 35 ते 40 लाख रुपये वाचले आहेत. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना ट्ँक्टर, बैलगाडी व मोटार सायकलने त्यांच्या शेतात आणि बेलंबा पर्यंत जाण्या येण्याची सोय झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांचे परळी तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत असून असा आदर्श गावकर्यांनी व शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला