मा.जिल्हाधिकारी साहेब शनिवार व रविवार दोन दिवस परळीसह जिल्हयात कडक जनता कर्फ्यू करावा - शिवकुमार केदारी


परळी वै.(प्रतिनिधी) -: आज पर्यंत आपण कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहात. खरोखर सर्व कोरोना योद्धांच्या कार्याला शतशः प्रणाम आहे. परंतु सद्य परिस्थितीत एवढया सा-या उपाय योजना करून ही विषाणु चा प्रादूर्भाव वाढतच आहे. याला आता फक्त आपणच रोखु शकता अशीही परिस्थिती नाही. आपल्या प्रयत्नांना लोकांचा योग्य तो प्रतिसाद मिळणे अत्यावश्यक आहे अशी मागणी सामजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी केली आहे  
                   परंतु लोक ही कुठपर्यंत घरी बसुन राहणार उदरनिर्वाह साठी कार्यरत रहाणे आवश्यक आहे व त्यासाठी शासनाने ही अनलाॅक ची प्रक्रिया सुरू केली. सद्य परिस्थितीत सर्वच जण आपापल्या ठिकाणी बरोबर असु शकतात पण विषाणु फैलावतो आहे हे नक्की.
   कांही लोक आज ही गंभीर नाहीत हे दिसुन येते. ना मास्क वापरणे, सोशल डिसन्टसिंग न पाळणे, विनाकारण घराबाहेर पडुन फिरत रहाणे, कार्यक्रमांचे निमित्त एकञीत येणे, कोणत्याही निमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे येणे. अशा एक नाही अनेक गोष्टी घडत आहेत ज्या आजच्या परिस्थितीत खुप धोकादायक ठरत आहेत.  व मी हे चुकीचे करत आहे . याची जाणीव देखील कांही लोकांना नाही. परंतु या व अशा अनेक कारणांमुळे विषाणु चा प्रादूर्भाव वाढत आहे हे नक्की. 
   वारंवार संचारबंदी करणे हे ही योग्य नाही असे मला वाटते. त्या ऐवजी रविवारी सर्व कार्यालय, सर्व आस्थापना इत्यादींना सुट्टी असते त्या सोबत शनिवार एक दिवस वाढवला व दोन दिवसाचा कडकडीत जनता कर्फ्यू महिन्यातील प्रत्येक शनिवार व रविवार या दोन दिवशी लागु केला तर. कोणीही कसल्याच कामासाठी घरा बाहेर पडायचेच नाही. ना दुध , ना भाजीपाला, ना किराणा या सर्व गोष्टींचा दोन दिवसांचा साठा सर्वजण करू शकतात. फक्त आणि फक्त वैद्यकिय कारणासाठी अन्यथा नाहीच . तर त्याचा थोडाफार पण महत्वाचा फायदा मिळु शकेल असे मला वैयक्तिक वाटते. व जे वाटले तेच इथे व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला