प्रधानमंत्री पिक विमा ऑफलाइन घ्या मनसेने मागणी


परळी (प्रतिनिधी) -: प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी जे शेतकरी तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन विमा प्रस्ताव दाखल करू शकले नाहीत त्यांच्यासाठी सर्व बॅंकांना ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी अधिकार्याना श्रीकांत पाथरकर, दत्ता दहिवाळ व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले. आंदोलनाच्या इशार्यानंतर IDBI बॅंकेने तात्काळ सुमारे 50 शेतकर्यांचे विमा प्रस्ताव घेणे चालू केले हे यश जरी असले तरी या दोन दिवसांपासूंच्या प्रसंगाने शेतकर्यांचा  शासनाकडून व बॅंक अधिकार्यानकडून कसा मोठ्या प्रमाणावर अपमान होतो  हे दिसून आले.
अजूनही SBI व बीड DCC ने शेतकर्यांचे विमा प्रस्ताव स्वीकारले नाहीत.मी स्वतः तहसीलदारांना फोन लावला फोन उचलला नाही,तालुका कृषी अधिकारी यांना फोन लावला तर ते म्हणाले मी तर सर्व अधिकार्याना सांगीतले आहे,इकडे बॅंक अधिकारी म्हणतात आम्ही विमा स्वीकारणार नाहीत.तिकडे शेतकरी बॅंकेच्या दारासमोर चार पाच तासांपासून विमा स्वीकारतील या भोळ्या आशेवर ताटकळत उभा आहे मध्येच बॅंकेचा security guard  शेतकर्यांना दम देऊन बाजुला होण्यास सांगतो.मला त्या वेळेस असा प्रश्न पडला की आपण पदाधिकारी असून आपणास हे अधिकारी घुमवतात तर सामान्य शेतकर्यांची काय कथा व व्यथा असेल.शेवटी जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेबांना फोन लावला पण   त्यांनी उचलला नाही.
शेवटी कांही शेतकरी व मी हताश होऊन घरी निघून आलोत.त्या दरम्यान मला मनाला असे वाटले की सर्वजण मी शेतकरी पुत्र म्हणतात व बापाचाच असा अपमान करतात.धिक्कार असो अशा अधिकार्यांचा व नेत्यांचा.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला