प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली
बीड (प्रतिनिधी) अखिल भारतीय भिक्खु बुद्धगयाचे संघानुशासक सध्दमादीत्य पुज्य भदन्त सदानंदजी महास्थवीर(केळझर)यांना प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीड यांच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
दिनांक 4 अॉगस्ट रोजी भदन्त सदानंद महास्थवीर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 82 व्या वर्षी नागपूर येथे निधन झाले.
भदन्त सदानंदजी महास्थवीर हे अनेक जागतिक परिषदेच्या व पर्यटनाच्या निमित्तानं *श्रीलंका,थायलँड,जापान,भुटान,नेपाळ,बांग्लादेश,म्यानमार आदी बौध्द राष्ट्रांमध्ये गेले होते.त्यांनी आतापर्यंत शेकडो भिक्खुंची निर्मिती केली आहे.महाराष्ट्र व विर्दभात अनेक मोठे मोठ्या परिषदेस उपस्थित राहुन अभ्यासपूर्ण अशी प्रवचने दिर्घ स्वरुपात दिली आहेत.याशिवाय थेरवादी परंपरेतुन बांग्ला भिक्खु संघाने सध्दम्मादित्य ही थोर पदवी प्रदान केली.सोबतच त्यांना महाराष्ट्र शासनाने दलितमित्र समाजभूषण अशा महत्त्वपुर्ण पदाने सन्मानित केले होते.भंतेजी वृध्दत्व अवस्थेमध्ये देखील धम्म प्रचारासाठी सतत भ्रमण करीत असत.त्यांनी अनेक ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. मिलिंद प्रश्न या अवघड अशा ग्रंथाचे भाषांतर व संकलन सोप्या शब्दात केले आहे.
सर्व उपासक मंडळीत व धम्म इतिहासात भंतेजी कायम आठवणीत राहतील असे प्रतिपादन भिक्खु धम्मशील यांनी केले.
यावेळी भिक्खु धम्ममशील यांच्यासह प्रा.प्रदीप रोडे,इंजी.वसंतराव तरकसे,अॕड.राजेश वाघमारे,भास्कर सरपते,कॕप्टन राजाभाऊ आठवले,प्रा.अशोक गायकवाड ,पंडीत चव्हाण ,प्रदीप घाडगे ,जालिंदर माने,परमेश्वर विद्यागर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment