शासनाच्या विविध योजनांसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाची स्वतंत्र शाखा निर्माण करून रिक्त पदे भरा-चेतन सौंदळे**पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह मुख्य प्रबंधकांकडे मागणी
परळी (प्रतिनिधी) -: प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी-वैजनाथ येथे सध्या अस्तित्वात असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या दोन्ही शाखेतील खातेदारांची बॅंकेतील व्यवहारासाठी प्रचंड गर्दी होत असून गर्दीमुळे ताटकळत उभे राहून बॅंकेतील कामकाजासाठी लागणाऱ्या विलंबामुळे मानसिक त्रास खातेदारांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव,पेन्शनर्स,विद्यार्थी व विविध शासकीय योजनेसाठी स्टेट बॅंक ऑफ ईंडीयाची किंवा राष्ट्रीयकृत बॅंकेची नव्याने स्वतंत्र शाखा निर्माण करण्याची मागणी नगरसेवक चेतन सौंदळे यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर,प्रतिष्ठित व्यापारी नंदूभाऊ तोतला,भारतीय विद्यार्थीसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बॅंकेतील शाखाधिकारी व सर्व कर्मचारी वृंद खातेदारांसाठी कोरोनाच्या महामारीतही बॅंकेतील गर्दीतही सेवा देण्यासाठी तत्पर आहेत परंतू अपु-या कर्मचारी संख्येमुळे बॅंकेतील कर्मचा-यांवर अतिरिक्त ताण येत असून त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परीणाम होत आहे.त्यामुळे बॅंकेतील रिक्तपदे तातडीने भरून शेतकरी,पेन्शनर्स,विद्यार्थी व विविध शासकीय योजनेसाठी स्वतंत्र शाखा निर्माण करण्याची मागणी पालकमंत्री मुंडे यांच्यासह मुख्य प्रबंधक ,मुंबई व सहाय्यक प्रबंधक,औरंगाबाद यांच्याकडे केल्याची माहिती नगरसेवक चेतन सौंदळे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment