वक्फ मुस्लीम बोर्डाच्या निर्णयाचे स्वागतच परंतु डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हाॅस्पीटलला दिले तर खर्या अर्थाने संविधान निर्मात्याचा सन्मान केल्या सारखे होईल - अॅड.सदानंद वाघमारे
बीड (प्रतिनिधी) दि.08 गेल्या अनेक वर्षा पासुन रामजन्मभमी व बाबरी मस्जीद चा वाद देशा मध्ये चालु होता २९ वर्षाच्या अथक प्रयत्नाने हा वाद न्यायालयाच्या मार्फत मिटला या मध्ये मुस्लीम वक्फ बोर्डाने जो देशा मध्ये आरोग्या विषयाची सामाजीक अडचण व सामाजीक भान ठेऊन हाॅस्पीटल बांधण्याचा जो निर्णय घेतला त्या बद्दल त्यांचे समस्त संविधान प्रेमी कडुन स्वागतच करण्यात आले असल्याचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा उस्मानाबाद निरीक्षक अॅड.सदानंद वाघमारे यांना म्हटले आहे. मंदिर व मस्जीद पेक्षा शाळा, काॅलेज,हाॅस्पीटलची आवश्यकता असल्याचे वक्फ बोर्डाच्या लक्षात आल्याने त्यांनी जो हाॅस्पीटलचा निर्णय घेतला तो निर्णय सर्व समाज बांधवाच्या हिताचा व लोक कल्याणकारी असल्याचे हि या वेळी अॅड.सदानंद वाघमारे म्हणाले.भारतीय संविधानाने गेल्या अनेक वर्षाचा वाद हा संविधानाच्या चौकटी मध्ये राहुन मुस्लीम बांधवांना दिला याचा सन्मान म्हणुन जर भारतीय संविधानाचे निर्माते असलेले भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हाॅस्पीटलला दिले तर अजुन मुस्लीम बांधवांकडुन संविधान निर्मात्याचा सन्मान केल्या सारखेच होईल असे हि,ते म्हणाले या विषयी आपण वक्फ मुस्लीम बोर्डाचे अध्यक्षांना निवेदना द्वारे मागणी केली असल्याचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा उस्मानाबाद निरीक्षक अॅड.सदानंद वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
Comments
Post a Comment