संस्कार प्राथमिक शाळेत स्व. विठ्ठलरावजी तांदळे सर यांची पुण्यतिथी साजरी
परळी (प्रतिनिधी) -: संस्कार प्रा. शाळेत आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी संस्थापक ,शिक्षणसम्राट,परळी भूषण आदर्श शिक्षक स्व. विठ्ठलरावजी तांदळे सर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
स्व. विठ्ठलरावजी तांदळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन नौकरी मिळविली.
त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना नौकरीसाठी अनेक अडचणी आल्या अशा अडचणी इतरांच्या वाटयाला येवू नये म्हणून गोर गरिबांची मुले शिकली पाहिजे त्यांना उच्य दर्जाचे चांगले शिक्षण मिळावे म्हणून एक पद्मावती शिक्षण संस्थेची स्थापना केली व त्या द्वारे संस्कार प्रा. शाळेच्या माध्यमातून परळीत शैक्षणिक चळवळ सुरू केली
आज या संकुलाचे वटवृक्षात रूपांतर विद्यमान सचिव श्री. दिपकजी तांदळे साहेब व श्री. कैलास तांदळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.विठ्ठलरावजी तांदळे सर यांचे स्वप्न पूर्ण केले.
यावेळी शाळेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते .
Comments
Post a Comment